Home Breaking News जि. प.हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

जि. प.हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

166

जि. प.हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

जि. प हाय.तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापली येथे दिनांक 2 जानेवारी 2023 ला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले तिथे प्राथमिक गट 19 माध्यमिक गट 17 कर्मचारी गट 12 अशे एकूण 48 प्रतिकृती प्रदर्शनी मध्ये सहभागी झाले. 2 दिवस चालणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाट्क निखिल कुमरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य धनंजय पोटदुखे भगवंतराव माध्यमिक शाळा तसेच प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख अरुणा बरलावर, प्राचार्य विनय चव्हाण श्रीकांत कोकुलवार मुख्याध्यापक राजीव गांधी शाळा, सत्यनारायण कोडापे सहा. प्रशासन अधिकारी, विनायक पूलकलवार विस्तारअधिकारी, नारायण बोरकुटे मुख्याध्यापक, संदीप सुखदेवे मुख्याध्यापक, तथा गटसाधन केंद्राचे कर्मचारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

केंद्रप्रमुख अरुणा बरलावार, श्रीकांत कोकुलवार सत्यनारायण कोडापे, उदघाटक गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे, प्रा. धनंजय पोटदुखे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन ज्योती कोसकेवाड मॅडम प्रास्ताविक किशोर खोब्रागडे साधन व्यक्ती यांनी केले तर आभार सुरज उतरावर यांनी मानले. कार्यक्रमास कनैया भांडारकर साधनव्यक्ती,गजभिये साधनव्यक्ती व पुंगाटी साधनव्यक्ती

श्रीरामे मॅडम आश्विनी हरिनखेडे प्राची मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी प्रयन्त केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद गटसधान केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Don`t copy text!