*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून कोपरल्ली येथील कुमरे परिवाराला आर्थिक मदत…!*

22

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून कोपरल्ली येथील कुमरे परिवाराला आर्थिक मदत…!*

 

मुलचेरा : तालुक्यातील कोपरल्ली येथील रोहिदास कुमरे यांनी तेंदूपत्ता संकलनासाठी गेले असता तेंदूचे झाड चढून तेंदूपत्ता तोडतांना झाडावरून पाय घसरल्याने खाली पडल्याने यात त्यांच्या हात व पाय दोन्ही मोडल्या गेले.या घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी  कोपरल्ली येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन या घटनेची माहिती जाणून घेत रोहिदास कुमरे यांना उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

 

रोहिदास कुमरे यांना आर्थिक मदत करतांना काँग्रेस मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गोटेवार,मुलचेरा नगरपंचायतचे नगरसेवक उमेश पेळूकर,ऍड.अकुदारी,रवी झाडे,सुबोले मंडल,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.