*दैनिक लोकमत समुहाचे राजेंद्र दर्डा आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सदिच्छा भेट*
*- राष्ट्रीय अधिवेशनाचे दिले निमंत्रण*
फोटो..
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
दैनिक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी मंत्री श्री.राजेंद्र दर्डा यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक लोकमत च्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
पत्रकारिता क्षेत्रातील या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये झालेल्या या भेटीमुळे माध्यम वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान उभय नेतृत्वामध्ये पत्रकारितेसमोरील सद्यस्थिती, डिजिटल मीडियाचे वाढते महत्त्व आणि पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यभरात सुरु असलेल्या कामकाजाची माहिती देण्याबरोबरच येत्या 18 आणि 19 एप्रिल 2026 मध्ये उदगीर या ठिकाणी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 वे राष्ट्रीय अधिवेशनचे उद्घाटक म्हणून रितसर निमंत्रण
दैनिक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी मंत्री श्री.राजेंद्र दर्डा यांना
मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी दिले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती सुद्धा श्री.दर्डा यांना दिली. श्री.राजेंद्र दर्डा यांनीही लोकमतच्या प्रवासातील अनुभव सांगत पत्रकारितेची मूल्ये जपण्यावर भर दिला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, प्रदेश सदस्य जितेंद्र सिरसाट आणि लोकमत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. अत्यंत मनमोकळ्या गप्पा आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या भेटीने पत्रकारितेतील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेतृत्वांमधील समन्वय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.







