*गडचिरोलीत रंगणार 39 वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा*
*माजी खासदार रामदासजी तडस यांची घोषणा;*
*जानेवारी 2027 मध्ये होणार आयोजन*
*गडचिरोली | दि. २२ मे २०२६*
*गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरणारी ३९ वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा जानेवारी २०२७ मध्ये गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणेचे अध्यक्ष मा. श्री रामदासजी तडस यांनी केली.*
*अचलपूर, जिल्हा अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ केसरी कुमार मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुस्तीपटूंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल लँडमार्क येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. रामदासजी तडस यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुणे यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पुढील वर्षी विदर्भ स्तरीय ३९ वी विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा भव्य स्वरूपात गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.*
*जानेवारी 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत खुला वजन गट पुरुष व महिला तसेच कुमार वजन गट मुले व मुली या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत*
*याप्रसंगी इंजि.प्रमोदजी पिपरे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ गडचिरोली तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे,भाजपा ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, गडचिरोली जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हा सचिव चंद्रगुप्त कुनघाडकर, रमेशजी भुरसे, विलासजी भांडेकर, प्रा. अरुण उराडे, काटवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या घोषणेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून युवा कुस्तीपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.*




