*समाज एकोप्याला चालना देणाऱ्या मोद्दुमोडगू येथील राधा-राणी भजन मंडळाला साऊंड सिस्टीमची भेट.*
*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्याकडून सामाजिक व भक्ती कार्याला प्रोत्साहन*
*आलापल्ली :-* समाजात भक्ती, संस्कार आणि एकोप्याची भावना रुजविण्यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या आलापल्ली येथील मोद्दुमोडगुच्या राधा-राणी भजन मंडळाला माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी उभे राहत त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राधा-राणी भजन मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सामाजिक व भजन कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात भक्तीभाव, सांस्कृतिक जपणूक आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य करत आहे. मंडळाच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. या भेटीमुळे मंडळाच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंडळाच्या सदस्यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे आभार मानत, समाजासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या नेतृत्वामुळे कार्यकर्ते व सामाजिक संस्थांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
प्रसंगी भाजपा जिल्हा सचिव अभिजीत शेंडे, आलापल्ली पेसा अध्यक्ष दिपक तोगरवार, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष मलेश तोटावार, अंकुश शेंडे, राजस्मित पोचमपल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते आलोक शील, किशोर धकाते, विश्वजित शील, तुलसी दीदी शील तसेच राधा-राणी भजन मंडळाचे सदस्य व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






