लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार
आलापल्ली येथील घटना
गडचिरोली
लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार शिक्षकास चिरडल्याची घटना आज दिनांक 20 मे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आलापल्ली येथील मुख्य चौकात घडली. यात दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला.
वासुदेव कुळमेथे वय 49 वर्ष रा. गोमनी असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते भगवंतराव प्राथमिक आश्रमशाळा काटेपल्ली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते
शिक्षक दुचाकीने चंद्रपूर मार्गाने जात असताना महाराष्ट्र बँकेसमोर मागून येणाऱ्या लोहखनिजाच्या ट्रकची दुचाकीला धडक बसली यात दुचाकीवरील शिक्षक वासुदेव कुळमेथे यांचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक आलापल्ली येथील महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट चा असल्याचे कळते.लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण आलापल्ली आष्टी मार्गावर वाढले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.