*जरावंडी परिसरातील बीएसएनएल सेवा पूर्णपणे विस्कळीत*
एटापल्ली तालुक्यापासून 52 किमी अंतरावर असलेला जरावंडी क्षेत्र हा बरेच महिन्यांपासून नेटवर्क सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे तेथील लोकांना या सर्व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जरावंडी परिसरातून कुणालाही कॉल केले असता कॉल ऑटोमॅटिक कट होतो तसेच कुणी कॉल केले असले तरी आवाज येत नाही आणि इंटरनेट सुविधा सुद्धा काम करत नाही आहे. या सर्व प्रकरणामुळे तेथील आदिवासी जनतेला खूप मोठा त्रास होत आहे. कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय काम करता येत नाही. या सर्व गोष्टीकडे शासन प्रशासन संपूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. जरावंडीतील बीएसएनएल नेटवर्क सेवा तात्काळ पूर्ववत करून बीएसएनएल नेटवर्क सेवा चालू करण्यात यावे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मनीष भाऊ दुर्गे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल.



