Home Breaking News *दुचाकीची झाडाला धडक शिक्षकाचा मृत्यू. विसोरा ते सीताबर्डी मार्गावर अपघात

*दुचाकीची झाडाला धडक शिक्षकाचा मृत्यू. विसोरा ते सीताबर्डी मार्गावर अपघात

146

*दुचाकीची झाडाला धडक शिक्षकाचा मृत्यू. विसोरा ते सीताबर्डी मार्गावर अपघात.*

 

 

 

देसाईगंज – कुरखेडा कडून वडसाच्या दिशेने जातांना दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट झाडाला आदळल्याने शिक्षक दिपक शामराव पिल्लेवान यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 21 जून ला दुपारी 1 वाजता घडली. विसोराच्या बसस्थानकापासून वडसा मार्गांवर अवघ्या दोनशे मिटर अंतरावर सदर अपघात झाला.

कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक दिपक शामराव पिल्लेवान वय 49 वर्ष आज जागतिक योग दिनानिमित्त शाळेत गेले होते. तिथून ते तहसील कार्यालय, कुरखेडा येथे बिएलओ म्हणून कामासाठी गेले. परत कुरखेडावरून वडसाला जात होते. कुरखेडा-वडसा या मार्गांवरील विसोरा ते सीताबर्डी दरम्यान असलेल्या गाव, किलोमीटर दर्शक फलकाच्या जवळ पिल्लेवान यांचे दुचाकी क्रमांक MH-33, Y-3067 वरील

नियंत्रण सुटले आणि दुचाकीसह पिल्लेवान रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक देत शेतात पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूपश्च्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि परिवार आहे. पिल्लेवान गुरुजीच्या निधनाने शिक्षक मित्र, सहकारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करत आहेत.

Don`t copy text!