Home Breaking News आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र

आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र

204

आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र

गडचिरोलीच्या वतीने स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

गडचिरोली,(जिमाका)दि.26: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षाबाबत स्पर्धापुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000/- ( एक हजार रुपये ) विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते तसेच पोलीस भरती करणा-या उमेदवांराना मैदानी सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.01/07/2023 पासुन 26/07/2023 पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत दि.27/07/2023 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थिलत राहावे अधिक माहीतीसाठी कार्यालयाच्या 07132-295143 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

****

Don`t copy text!