पत्नी चुलत भावाच्या लग्नात डीजेवर बेभान नाचली अन् पतीचे डोके फिरले व पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेतला
नांदेड – वृत्तवानी न्यूज
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून चुलत भावाच्या लग्नात पत्नी डीजेवर बेभान होऊन नाचल्याचा राग मनात धरून पत्नीची हत्या केली.आणि स्वतःही आपले जीवन संपवले.
भोकर तालुक्यातील फुलणवाडी तांडा येथील रहिवाशी असलेले विनोद रंगराव राठोड वय 40वर्षे आणि त्याची पत्नी पायल विनोद राठोड वय 27 वर्ष हे एका लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते.10 मे रोजी लग्नादरम्यान पायल यांनी डीजेवर डान्स केला होता. तो विनोदला आवडला नाही.याच कारणावरून दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणा नंतर पायल आपल्या मुलांसह माहेरी निघून गेली.मात्र विनोद याच्या मनातील राग शांत झाला नव्हता.मंगळवारी पहाटे 3 वाजता दरम्यान झोपेत असलेल्या पायलचा चाकूने गळा चिरून खून केला.पत्नी पायलची हत्या केल्यानंतर गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केली.
या भीषण हत्याकांडामुळे आणि आत्महत्यामुळे कुटुंबातील दोन मुली व एका आठ महिन्याच्या चिमुकली अनाथ झाली.या भयावह घटनेमुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे.






