म्हशींच्या कळपाने केला वाघावर हल्ला!
मूल तालुक्यातील घटना
मूल प्रतिनिधी:
तालुक्यातील चकदुगाळा शिवारात वाघाने गाय, म्हशींचा कळप रोखून धरला होता.बराच वेळ झाली तरी वाघ काहीच हालचाल करत नव्हता .त्यानंतर म्हशींच्या कळपाने वाघावरच हल्ला चढविला.व वाघाला हुसकावून लावल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास गुराखी दुपारच्या सुमारास शेतशिवारात गायी, म्हशी घेऊन गेले होते. तेव्हा हा प्रकार घडला.तेव्हा काही गावकऱ्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. वाघ उठून उभा होताच कळपाने त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी वाघ धडपड करीत निघून गेला. वाघ पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गोळा झाले होते.



