*जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे सांस्कृतिक कार्यक्रमांसह दहीहंडी उत्सव साजरा*
वृत्तवाणी न्यूज
एटापल्ली ता.प्र.-येथील जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तथा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला.विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण ,राधा ,गोपिकांचा वेशभूषा परिधान करून कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला.
सर्वप्रथम शालेय परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
सर्वप्रथम प्राचार्य विनय चव्हाण यांच्या हस्ते दहीहंडीची विधिवत पूजा करण्यात आली.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमासह अथक प्रयत्नानंतर मिडलस्कुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात दहीहंडी फोडली.
या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात विध्यार्थ्यांसह शाळेचे प्राचार्य विनय चव्हाण,श्री संतोष सिडाम, प्रा.गणेश आत्राम,प्रा.घोडेस्वार, श्री जांभोरे सर, श्री घरामी सर, श्री प्रविण चन्नावार,श्री मनोज इरले,कु.श्रीरामे म्याडम,कोस्केवाड मॅडम,अश्विनी मॅडम,प्राची मॅडम, आरती पवार मॅडम,कल्यानी मॅडम,दुर्गे मॅडम,सरकार मॅडम,करमरकर मॅडम, शेट्ये मॅडम,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



