*भाजपा चामोर्शी तालुक्याची सुपर वारीयर्स ची बैठक संपन्न* *महाविजय 2024 अंतर्गत सुपर वारीयर्सशी साधला प्रत्यक्ष संवाद*

68

*भाजपा चामोर्शी तालुक्याची सुपर वारीयर्स ची बैठक संपन्न*

 

*महाविजय 2024 अंतर्गत सुपर वारीयर्सशी साधला प्रत्यक्ष संवाद*

 

*गडचिरोली:-दि.२८ डिसेंबर २०२४*

 

*भाजपा महाविजय 2024 अंतर्गत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यात लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात सुपर वारीयर्सची बैठक संपन्न झाली.*

 

*बैठकीत प्रमोदजी पिपरे यांनी सुपर वारीयर्सशी प्रत्यक्ष संवाद साधत खालील विषयांवर सविस्तर चर्चा केली.विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक ३ बुथ मागे एक सक्षम सुपर वारीयर्स नेमणे.प्रत्येक सुपर वारीयर्सला महाविजय 2024 पुस्तकातील प्रत्येक मुद्दा व विषय माहीत असणे व ते सर्व मुद्दे दिलेल्या ३ बुथवर राबवून घेणे.तसेच प्रत्येक बुथ सक्षमीकरण करणे.*

*यावेळी सक्षम सुपर वारीयर्सची माहिती गोळा करण्यात आली.*

*बैठकीला जिल्हा सचिव दिलीप चलाख,तालुका अध्यक्ष आनंद भांडेकर,शहर अध्यक्ष सोपान नैताम,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राठी,तालुका महामंत्री विनोद गौरकर,संजय खेडेकर,विकास मैत्र,लोमेश सातपुते, काशिनाथ बुरांडे,लक्षण वासेकर,रामचंद्र वरवाळे तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, बुथ पालक,बुथ कारकर्ते उपस्थित होते.*