स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत निवासी प्रशिक्षण शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी घेतला प्रात्यक्षिकांचा अनुभव
श्वान पथकाकडून प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली माहिती विविध स्पर्धामधुन विद्यार्थ्यांनी दाखविले कौशल्य
राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन २०१८ पासुन राष्ट्रीय स्तरावर “स्टुडंट पोलीस कैडेट प्रोग्राम” राबफिला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता ०८ वी प ०९ यी मधील विद्यार्थ्यांकरीता आंतरवर्ग, बाह्यवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करुन विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्याथ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्य शिकविले जात असून समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकावला करण्यासाठी तयार केले जात आहे. पासोचतच विद्याथ्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन इ. नैतिक प्रामाणिकपणा मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वांगीन विकासात भर पडावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक २६/१२/२०२३ ते २०/१२/२०२३ पर्यंत एनसीसीचे धर्तीवर पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिचीराचे” आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज तिसरा दिवस असून, आज दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी योगा व शारीरिक कवायत घेऊन पथसंचलन सराच घेण्यात आले. त्यानंतर पोउपनि रामदास ढोके व त्यांच्या पथकाकडून श्वान पथकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे बाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात बघतांना विद्याध्यर्थ्यांनी आनंद लुटला. त्यानंतर नितीतत्वे, संयम, सहनशिलता, संवेदना, सहानुभूती, वडीलधा-यांचा आदर या विषयावर सपोनि, सदाशिव देशमुख, शिस्त संघभावना, दृष्टीकोन या विषयावर शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर, भ्रष्टाचार विरोधी लढा या विषयावर ला.सु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि, राठोड तसेच महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना या विषयावर स्था.गु.शा. चे पोनि, उल्हास भुसारी व कम्यूनिटी पोलीसींग या विषयावर मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तथा सदस्य सचिव एस.पी.सी गडचिरोली श्री. कुमार चिता सा. यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर १०० मीटर धावण्याची स्पर्धा, ४०० मीटर ४ ४ १०० रीले स्पर्धा, कयद्दी व प्हालीवॉल स्पर्धा है. सांधीक खेळ घेण्यात आले, यानंतर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.
आजच्या कार्यक्रमप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस
अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार थिता सर, ला.लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. राठोड, स्था. गु.शा.चे पोनि, उल्हास मुसारी तसेच शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या परास्यितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि, श्री. धनंजय पाटील, पोउपनि, भारत निकाळजे तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले.




