*”संदेशखाली की महिलाएं कर रही थी पुकार*,
*फिर भी कुंभकर्ण बन चुकी थी ममता सरकार”*
*पश्चिम बंगाल मध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराला पाठिंबा देणाऱ्या पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपा महिला आघाडी गडचिरोली तर्फे जाहीर निषेध*
*गडचिरोली*:- *दि. १ मार्च २०२४*
*पश्चिम बंगाल येथे असलेले काँग्रेस नेते शहाजहा शेख याने महिलांवर अत्याचार व तसेच लाठीचार्ज केला तरीही या प्रकरणात पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहाजहा शेख याला पाठीशी घालत सहकार्य केले*,
*ज्या राज्याच्या मुख्यमंत्री एक महिला असून स्वतःच्याच राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी त्या खंबीरपने उभ्या राहू शकत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे*,
*ज्या देशात स्त्री ला देवीसमान पूजल्या जाते*, *त्याच ठिकाणी स्त्रियांची ही अवस्था झाली , ही अतिशय निंदनीय बाब आहे, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी केले, त्यानिमित्ताने महिलांवर अत्याचार करणाऱ्या शाहजहा शेख याला पाठिंबा व सहकार्य करणाऱ्या पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता ताई हिंगे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे तीव्र निषेध नोंदविण्यात आला व आंदोलन करण्यात आले*.
*या वेळी गडचिरोली भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, जिल्हा महामंत्री त्रिशा डोईजड,सोशल मिडिया जिल्हा संयोजिका वैष्णवी डोंगरे,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,जिल्हा सचिव सीमा कन्नमवार, प्रतिमा सोनवणे, सुनीता आलेवार,भारती खोब्रागडे, रोशनी राजुरकर, सपना किरमिरवार व भाजप महिला आघाडीच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या