हजारो पत्रकार अजूनही सरकारच्या योजनापासून वंचीत :एस एम देशमुख।। नागपूर येथे मराठी पत्रकार परिषदेची विभागीय बैठक

109

हजारो पत्रकार अजूनही सरकारच्या योजनापासून वंचीत :एस एम देशमुख।। नागपूर येथे मराठी पत्रकार परिषदेची विभागीय बैठक.

गडचिरोली (ता .२):राज्य सरकारची अधिस्वीकृती किंवा यशवंतराव चव्हाण पत्रकार कल्याण योजना यातील जाचक अटीमुळे अजूनही राज्यातील हजारो पत्रकार याच्या लाभापासून वंचित आहेत.असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले. नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या हॉल मध्ये आज मराठी पत्रकार परिषदेची नागपूर विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे एस एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक, उपाध्यक्षा जान्हवी पाटील,अधिस्वीकृती समितीचे सदस्य शिवराज काटकर,महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा शोभा जयपूरकर,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व अधिस्वीकृती समिती सदस्य अविनाश भांडेकर, नागपूर जिल्हा संघाचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार, सरचिटणीस संजय देशमुख, कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे,भंडारा जिल्हाध्यक्ष चेतन भैरम, वर्धा जिल्हाध्यक्ष चारू पाटील आदी उपस्थित होते.

सरकार सुद्धा पत्रकाराच्या कल्याणासाठी असलेल्या या योजनांसाठी असलेल्या ठराविक निधीत वाढ करीत नाही त्यामुळे या निधीतून जास्त पत्रकारांना आरोग्यसेवा, पेन्शन असे लाभ देण्यासाठी निधी शिल्लक राहत नाही. याशिवाय पत्रकार संरक्षण कायदा करूनसुद्धा त्याला अद्याप लागू करण्यात आला नसल्याने त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकार कडे ह्या सर्व मागण्या चा सतत पाठपुरावा करून सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना विश्वस्त किरण नाईक यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर मराठी पत्रकार परिषद नियमित लढा देत असून सरकारने यावर गंभीर झाले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार हा सतत उपेक्षित राहिला आहे याला सुद्धा विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे असे मत मांडले. उपस्थित पाहुण्यांचा नागपूर व गडचिरोली जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचलन सुभाष वऱ्हाडे,प्रास्ताविक प्रदीप घुमडवार तर आभार अविनाश भांडेकर यांनी मानले. बैठकीला कृष्णकुमार मिश्रा, सुभाष राऊत, उपाध्यक्ष अमरचंद जैन, लोमेश बुरांडे ,अँड मनीष कासर्लावार, बबन वडेट्टीवार ,गजानन बारसागडे, प्रवीण चन्नावार सुरज बोमनवार, उदय गडकरी, दवणे,गणेश धानोरकर, हरिदास लुटे,गजेंद्र डोंगरे ,योगेश गिरडकर, विनोद डांगरे, किशोर दुन्डेले,सुनील जालंधर,अजय तायवाडे, समीर पठाण, राजेंद्र सांभारे,सूर्यभान फरकाडे,सज्जन पाटील, अभय लांजेवार,श्याम पेठकर, गणेश सोनटक्के ,सरचिटणीस, कार्याध्यक्ष भंडारा, गडचिरोली ,वर्धा ,चंद्रपूर येथील पदाधिकारी उपस्थित होते