अखिल भारतीय गाणली समाज संघटना गडचिरोली जिल्हा कार्यकारणीची सभा संपन्न
गडचिरोली:-
आज दिनांक 05.07.2025 रोज शनिवारला अखिल भारतीय गाणली समाज संघटना,जिल्हा- गडचिरोली ची सभा कार्यकारणीचे *अध्यक्ष मा. नितीन भाऊ संगीडवार* यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये गडचिरोली शहर व कार्यक्षेत्रात येणाऱ्या समाज बांधवांच्या कुटुंब संकलन माहिती विषयी चर्चा करण्यात आली. कार्यकारिणीतील सदस्य मा.अशोक भाऊ पोरेड्डीवार व अविनाश भाऊ वडेट्टीवार यांनी घोट आणि परिसरातील, मा. कमलाकर भाऊ वडेट्टीवार यांनी नवेगाव परिसरातील, कुटुंब संकलन केलेली माहिती गोळा केली. सभेला कार्याध्यक्ष मा. जयंत भाऊ बल्लमवार,सल्लागार मा. शंकररावजी कस्तुरवार, उपाध्यक्ष अशोक भाऊ पोरेड्डीवार, कोषाध्यक्ष मा. घनश्याम भाऊ मनबतूलवार,प्रसिद्धी प्रमुख मा. प्रवीण भाऊ चन्नावार, ज्येष्ठ सदस्य मा. कमलाकर भाऊ वडेट्टीवार, कार्यकारणीचे सदस्य मा. दिलीप भाऊ शृंगारपवार आदी उपस्थित होते.