Home Breaking News *_विष्णूपूर येथे श्री. श्री. राधाकृष्ण रासलीला उत्सवात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची...

*_विष्णूपूर येथे श्री. श्री. राधाकृष्ण रासलीला उत्सवात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती.._*

95

*_विष्णूपूर येथे श्री. श्री. राधाकृष्ण रासलीला उत्सवात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती.._*

दि.०९ नोव्हेंबर २०२५

विष्णूपूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली)

चामोर्शी तालुक्यातील विष्णूपूर नं. १२२/९५ येथील सार्वजनिक श्री. श्री. राधाकृष्ण मंदिर प्रांगणात मागील ३५ वर्षांपासून परंपरेने आयोजित केला जाणारा श्री. श्री. राधाकृष्ण रासलीला उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.

 

या आध्यात्मिक सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भेट देऊन श्री राधाकृष्ण मंदिरात पूजाअर्चा केली व दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत विकासाच्या काही मुद्द्यांवरही चर्चा केली.

 

कार्यक्रमावेळी नगरसेवक आशिष पिपरे, सरपंच ह्रदय बाला, उपसरपंच महानंदा हलदार, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू ढाली, ज्येष्ठ नेते सुकेन शाकाहारी,जेष्ठ नेते मल्लिक सर, कमिटी अध्यक्ष नित्य ठाकुर, उपाध्यक्ष सुनिल बिश्वास तसेच गावातील मान्यवर नागरिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले “अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आज समाजाला नितांत गरज आहे. गेल्या ३५ वर्षांपासून विष्णूपुर गावाने ही सुंदर परंपरा जपली आहे, हे अभिमानास्पद आहे. समाज एकत्र येऊन अध्यात्म आणि संस्कृती ही प्रज्वलित ठेवावी.”

पुढे बोलत त्यांनी शाळकरी मुला-मुलींसाठी बससुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली, तसेच गावातील सभागृह, रस्ता दुरुस्तीच्या प्रश्नांवर लक्ष देऊन लवकरच उपाय केले जातील, असे आश्वासन दिले.

 

शेवटी डॉ. नेते यांनी रासलीला उत्सव समिती व ग्रामस्थांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पारंपरिक भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांच्या स्वरांनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.

Don`t copy text!