Home Breaking News देशभक्तीचा संदेश देणारी श्रद्धांजली सभा लाल किल्ला बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना मेणबत्ती लावून...

देशभक्तीचा संदेश देणारी श्रद्धांजली सभा लाल किल्ला बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली – कारगिल चौक, गडचिरोली येथे कार्यक्रम

65

 

देशभक्तीचा संदेश देणारी श्रद्धांजली सभा

लाल किल्ला बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली – कारगिल चौक, गडचिरोली येथे कार्यक्रम

 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

काल नवी दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात निर्दोष नागरिकांचा झालेला मृत्यू हा संपूर्ण देशासाठी अत्यंत वेदनादायी व संतापजनक प्रकार आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या हुतात्म नागरिकांना कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता कारगिल चौक स्मारक, गडचिरोली येथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमाचा उद्देश देशभक्तीची भावना जागवणे, दहशतवादाविरोधात एकजूट निर्माण करणे आणि देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक नागरिकाला सन्मान देणे हा आहे. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थित नागरिकांना दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली

दिनांक : १२ नोव्हेंबर २०२५

स्थळ : कारगिल चौक स्मारक, गडचिरोली

वेळ : सायं. ६:३० वा.

 

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाने नागरिकांना आवाहन केले आहे की —

“आपल्या मेणबत्तीतील प्रकाशाने अंधारावर विजय मिळवू या,

देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित ठेवूया !”

 

या प्रसंगी सामाजिक संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी, सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते, पत्रकार, तसेच सर्व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन अध्यक्ष उदय धकाते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!