Home Breaking News *निधन वार्ता*   *डॉ. दिवाकर मारकवार यांचे निधन* 

*निधन वार्ता*   *डॉ. दिवाकर मारकवार यांचे निधन* 

137

*निधन वार्ता*

 

*डॉ. दिवाकर मारकवार यांचे निधन*

 

आरमोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य काॅ. अमोल मारकवार यांचे वडील डॉ. दिवाकर मारकवार यांचे आज शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजता उपचारा दरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्रात त्यांनी आपल्या वयाची ३० वर्षे सेवा दिली. दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. दिवाकर मारकवार यांची मागील काही दिवसांपासून वृध्दापकाळामुळे त्यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना ब्रम्हपुरी येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आरमोरी येथील गाढवी नदीवर आज दुपारी १.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा काॅ. अमोल मारकवार, एक मुलगी, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Don`t copy text!