*राष्ट्रीय स्पर्धेत पात्र ठरलेल्या अनन्याने घेतली आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट*
*पुढील वाटचालीसाठी बाबांनी दिले शुभेच्छा*
राष्ट्रीय स्तरावरील एअर पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आलापल्ली येथील कु.अनन्या अविनाश सामलवार हिने आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर पिस्तोल शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अनन्याने राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
यावेळी आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अनन्याचे अभिनंदन करून तिच्या पुढील स्पर्धात्मक वाटचालीसाठी एअर पिस्तोल भेट दिले. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम यश संपादन करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तसेच अनन्याच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.






