Home Breaking News पोलीस-नक्षल चकमक शोध मोहिमेबाबत

पोलीस-नक्षल चकमक शोध मोहिमेबाबत

59

पोलीस-नक्षल चकमक शोध मोहिमेबाबत

गडचिरोली, (जिमाका) दि.14: सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, पोलीस स्टेशन गट्टा, पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत मौजा-मोडस्के जंगल परिसरात दिनांक 17.09.2025 रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमक दरम्यान 2 नक्षल मृतदेह ( 2 महीला) शस्त्रासह सापडल्याचे दिसुन येते. सदर घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तीचे / मृतदेहाचे कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने, सदर प्रकरणात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 196 अन्वये दंडाधिकारीय चौकशी करावयाची आहे.

तरी जाहीररित्या सुचित करण्यात येते की, या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यानी खालील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी, एटापल्ली येथे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्या न्यायालयात जाहीर सूचना प्रसिध्दी झाल्यापासून 15 दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावीत. आपण पाहिल्या प्रमाणे घटनेचे वर्णन, आपला या घटने विषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधीत काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती. असे उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांनी कळविले आहे.

 

0000

Don`t copy text!