नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे श्रीकृष्ण पेंदाम सहाय्यक गटविकास अधिकारी यांची भेट
एटापल्ली तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, गट्टा येथे मा. पेंदाम साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांनी सविस्तर पाहणी भेट दिली. या भेटीदरम्यान शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, निवासी सुविधा, विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता व सुरक्षितता यासह प्रशासकीय बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी मा. पेंदाम साहेब यांच्यासोबत श्री. डोर्लीकर लेखाधिकारी, श्री. कोवे गटसमन्वयक, श्री. मेश्राम ग्रामविकास अधिकारी, श्री. बांबोळे पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बेडके, शिक्षक श्री. टेकाम व शाळेचे चौकीदार श्री. बोडगेलवार हेही उपस्थित होते.
भेटीदरम्यान मा. सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी वर्गखोल्या, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, स्वयंपाकगृह, भोजन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे तसेच परिसरातील स्वच्छता यांची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम अंमलबजावणी तसेच सहशालेय उपक्रमांबाबत माहिती घेतली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिस्त, नियमित अध्ययन, स्वच्छता व आरोग्य यावर विशेष भर देण्याच्या सूचना मा. पेंदाम साहेब यांनी दिल्या. तसेच शाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शाळेतील कार्यपद्धती समाधानकारक असल्याचे नमूद करत आवश्यक त्या सुधारणा व सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सकारात्मक सूचना देण्यात आल्या. या भेटीमुळे शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या गुणवत्तावृद्धीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





