जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम येथे प्रणय तांबे मुख्याधिकारी नगरपंचायत एटापल्ली यांनी वडिलांच्या वाढदिवशी केले शैक्षणिक साहित्य वाटप
एटापल्ली: वृत्तवानी न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम येथे प्रणय तांबे मुख्याधिकारी नगरपंचायत एटापल्ली यांनी वडील शंकरराव तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम येथे शाळेला भेट दिली. भेटी दरम्यान शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी .ऋषीकेश बुरडकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली व .सौ.रीया ऋषीकेश बुरडकर तसेच श्री प्रणय तांबे मुख्याधिकारी नगरपंचायत एटापल्ली व सौ.ऋध्दा प्रणय तांबे यांचे हस्ते सर्व उपस्थित 29 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून वाचन, नृत्य, कविता गायन करून घेतले. तसेच शाळेतील परसबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.




