*सर्व सामान्य गोरगरिबांना आधार! सर्वांना न्याय, हाच संकल्प! -*
*!मक्केपल्ली चेक नंबर एक येथील कॅन्सर ग्रस्त रुग्णास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने आर्थिक मदत!…*
घोट दिनांक 16 फेब्रुवारी 2026 गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मक्केपल्ली चेक नंबर एक येथील रहिवाशी जमनादास निमगडे कॅन्सर या रोगाणे गेल्या काही वर्षापासून व्याधीग्रस्त आहे घराची परिस्थिती अतिशय हलाखीची असून जीवन कसे जगावे व प्रामुख्याने आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
दैनंदिन जीवनामध्ये औषध उपचाराचा खर्च कसा करावा? हा खूप मोठा प्रश्न होता, यावेळी या भागातील मानवाधिकार संघटन पदाधिकारी कार्यकर्ते यांनी याबाबत माहिती दिली व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी या विषयाची तात्काळ दखल घेऊन मकेपल्ली चेक नंबर एक या गावात दाखल झाले आणि या संबंधित रुग्णास आर्थिक मदत करून पुढील उपचारा बाबत माहिती मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, संघटना नेते प्रवीण गेडाम.
स्थानिक भाजपा नेते संदीप भोवरे, गुरूदास पालकवार, केशव खोब्रागडे, प्यारेलाल डोंगरे,
मानवाधिकार संघटन पदाधिकारी विलास वडेट्टीवार, तालुका सचिव दिनेश मुजुमदार व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






