Home Breaking News गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा” पर्दाफाश

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा” पर्दाफाश

9

 

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा” पर्दाफाश

 

. हायटेक पिं्रटर, बॉण्ड पेपर, व बनावट नोटा सह एकुण 39,700 किंमतीचा मुद्देमाल जप्त

. बँकेत जमा झालेल्या बनावट चलनी नोटामुळे उघड झाले रॅकेट

 

गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोस्टे गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांचे संयुक्त कारवाईत बनावट चलनी नोटा, हायटेक कलर पिं्रटर, संगणकीय उपकरणे, बॉण्ड पेपर आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली दिनांक 15/05/2026 रोजी फिर्यादी नामेे प्रतिक बाबाराव अनासने, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून पोस्टे गडचिरोली येथे अप क्र. 602/2026 कलम 179 भा. न्या. स.- 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हाच्या तपास पोनि श्री. विनोद चव्हाण यांनी हाती घेतला. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम डिपॉझीट मशीनचे सिसिटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता दिनांक 11/05/2026 रोजी रुपये 100 च्या 21 असे रुपये 2100/- बनावट चलनी नोटा आरोपी नामे प्रमोद टिकाराम कोवे, वय 23 वर्ष रा. हळदा ता. ब्राम्हपुरी जि. चंद्रपुर याने बनावट चलणी नोटा बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम डिपॉझीट मशीन येथे जमा केल्याचे निष्पण झाले. सदर आरोपी प्रमोद टिकाराम कोवे यास दिनांक 15/05/2026 रोजी रात्री अटक करण्यात आली. अटक आरोपीकडे सखोल चौकशी केले असता त्याने सदर बनावट नोटा या आदित्य जनार्धन रेचनकर, वय 19 वर्ष, रा. राम मंदिर आरमोरी रोड गडचिरोली जि. गडचिरोली याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.

तसेच आदित्य रेचनकर हा नागपुर येथे वास्तव्यास असलेल्या ‘चिटू’ नावाच्या व्यक्ती कडुन बनावट नोटा आणत असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे आरोपी नामे आदित्य रेचनकर व ईतर संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोस्टे गडचिरोली तसेच स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांचे संयुक्त पथक दिनांक 16/05/2026 रोजी रात्री नागपुर येथे रवाना झाले. तांत्रिक विश्लेषन व आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे नागपूर शहरातील त्रिमुर्ती नगर परिसरातील एका अपार्टमेंट मधील फ्लॅटवर छापा टाकण्यात येवून झडती घेतली असता सदर फ्लॅटमध्ये बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पिं्रटर, बॉण्ड पेपर , कटर, अर्धवट छापलेल्या चलनी नोटा ईत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपी नामे 1) मयुर लक्ष्मीकांत डोईजळ वय-31 वर्ष रा. कॅम्प एरिया गडचिरोजी जि. गडचिरोली 2) आदित्य लक्ष्मीकांत डोईजड वय-26 वर्ष रा. कॅम्प एरिया, गडचिरोली जि. गडचिरोली 3) आदित्य जनार्धन रेचनकर वय-19 वर्ष, रा. राम मंदिर आरमोरी रोड गडचिरोली जि. गडचिरोली यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपींना दिनांक 17/05/2026 रोजी पोस्टे गडचिरोली येथे आणून अटक करण्यात आली.

यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे दिनांक 15/05/2026 रोजी अप. क्र. 602/2026, कलम 179 भा. न्या. स. 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून, मिळून आलेला मुद्देमाल, (1) 100 रुपयेच्या 21 नोटा असे एकुण रुपये 2100/- बनावट नोटा, (2) एचपी कलर पिं्रटर मॉडल क्रमांक 419 HP Ink Tank Wireless 15000/- रुपये किंतमीचे, (3) jk Bond चे पूर्ण रिम 540 रपये किंतीचे कोरा रिम, (4) रुपये 50 चे पेपवर छापलेले 31 पाने (रुपये 1550/- बनावट), (5) रुपये 100 चे पेपरवर छापलेले 180 पाने (रुपये 18,000/- बनावट), (6) रुपये 200 चे पेपवर छापलेले 4 पेजेस रुपये (800/- बनावट), (7) रुपये 100 चे 12 नोटा (रुपये 1200/- बनावट), (8) कट केलेले पेजेस नोटा बाजुला काढुन ठेवलेले 557 पाने रुपये 460 किंमत, (9) एका बाजुला 100 व दुस­या बाजुला 200 असे छापलेले 1 पान, (10) एका बाजुला 100 व दुस­या बाजुला 50 असे छापलेले 01 पान, (11) कोरे बॉन्ड पाने 48, (12) 2 लहान प्लास्टीक स्केल रपये 10, (13) 2 कटर 40 रुपये किंमतीचे असा एकणु 37,600 रुपये किंमतीचे कलर पिं्रटर व पिं्रटींग केलेले रुपये 50, रुपये 100, रुपये 200 बनावट नोटा व कागद असे साहित्य मिळुन आले व मुळ फिर्यादीने 21,00/- रुपये बनावट नोटा असे एकुण 39,700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर चारही आरोपीस दिनांक 22/05/2026 पावेतो पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे गडचिरोली येथील पोनि श्री. विनोद चव्हाण हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण फेगडे, पोस्टे गडचिरोली चे प्रभारी अधिकारी पोनि विनोद चव्हाण यांचे नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोउपनि शिवाजी देशमुख तसेच अंमलदार यांनी पार पाडली.

Don`t copy text!