*शिवसेना महिला आघाडीच्या* *वतीने भोजनदान* *करून सह पालक मंत्री* *आशिष जयस्वाल यांचा* *वाढदिवस साजरा*
*गडचिरोली.* शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा गडचिरोली च्या वतीने मा. सह पालक मंत्री आशिष भाऊ जयस्वाल यांचा वाढ दिवस माजी महिला जिल्हा प्रमुख तथा माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे यांच्या उपस्थितीत पार पडला वाढ दिवसाच्या निमित्ताने जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे महिला रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भोजन दान (भोजन थाळी) देऊन साजरा करण्यात आला तसेच तसेच उपस्थित नागरिकांना पेढे वाटण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना पदाधिकारी छाया ताई कुंभारे माजी जिल्हा प्रमुख तथा माजी बांधकाम सभापती राजाभाऊ कावळे.नवनाथ उके राहुल सोरते सुशीला जयसिंगपूर सीमा पराशर आरती खोब्रागडे गीता मेश्राम ज्योत्स्ना राजूरकर अश्विनी भांडेकर वीणा निंबेकर बहु संख्य शिवसैनिक उपस्थित होते







