भाकपा कार्यकर्ता कॉ. विशाल पूज्जलवार यांच्या पुढाकाराने गट्टा गावातील बंद बोअरवेल दुरुस्त; नागरिकांना दिलासा
एटापल्ली तालुक्यातील गट्टा गावात अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले बोअरवेल अखेर दुरुस्त करण्यात आले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई जाणवत असताना ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे।
संतोष नरोटी यांच्या घराजवळील हे बोअरवेल बराच काळ बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन भाकपा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) चे कार्यकर्ता कॉ. विशाल पूज्जलवार यांनी तत्काळ पुढाकार घेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनोज मेश्राम यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला।
ग्रामसेवकांच्या सहकार्याने संबंधित बोअरवेलची दुरुस्ती करण्यात आली आणि पुन्हा पाणीपुरवठा सुरू झाला. यामुळे गट्टा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत कॉ. विशाल पूज्जलवार यांचे आभार मानले आहेत।
स्थानिक पातळीवर जनतेच्या अडचणी तत्परतेने सोडविण्याचे काम केल्याबद्दल कॉ.सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव व कॉ.सुरज जककुलवार जि.सद्स यांनी
कॉ. विशाल पूज्जलवार यांचे कौतुक केले व जनतेचा सेवेत भाकपा नेहमी आहे जनतेने भाकपा ला संपर्क करावे.







