अर्धवेळ स्री परिचय संघटनेचा (सिटु) जिल्हा मेळावा संपन्न
अर्धवेळ स्री परिचय संघटनेचा (सिटु) जिल्हा मेळावा गडचिरोली येथे सेमाना देवस्थान च्या सभागृहात घेण्यात आला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉ.अमोल मारकवार जिल्हा सचिव माकपा हे होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. अरुण भेलके, चंद्रपूर हे होते.
या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, सतिश दुडमलवार हे सुध्दा उपस्थित होते.
सन 19620 पासुन अर्धवेळ स्त्री परिचर म्हणून या महिलांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात फक्त 50 रुपये मासिक मानधनावर या महिला काम करत होत्या. काही वर्षानी तो वाढवून फक्त तीन हजार करण्यात आला. कामाचा प्रकार अर्धवेळ म्हणून जरी असला तरी पण रोज 8/10 तास काम सदर महिलाना करव लागत होते . अल्प मानधनावर काम करत असल्या तरी जनतेच्या आरोग्याची काळजी या महिला नेहमी घेत होत्या. कोरोना काळात या महिलांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून काम केले. पण कधी पाठ दाखवली नाही.
शासनाने मात्र यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही असा आरोप मारकवार यांनी मेळव्यात बोलतांनी केला.
सिटु संघटनेच्या संघर्षा मुळे मासीक मानधन सहा हजार करण्यात आले असले तरी ते पुरेसे नाही.
सदर महिलांना
अर्धवेळ न समजता पुर्ण वेळ समजण्यात यांवे, मासीक मानधन वीस हजार रुपये करण्यात यावे, पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यांवे, कोरोना काळातील कोरोना भक्ता देण्यात यावे यासाठी सिटु संघटनेच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरुच ठेवण्याचा निर्धार या मेळ्यावात घेण्यात आला.
या मेळाव्यात कॉ. अर्चना मारकवार, वैशाली शास्राकार,भाविका राऊत, ज्योती देवानंद दुर्गे,सुरेखा केळझरकर,साबेसा शेख, रेखा बंडावार,शामलता कुंभारे, रसिका मोहुर्ले,जया कन्नाके अनिता नैताम, कुसुम चंदेल,देवलाबाई भैसा,रेवता सहारे कुसुम मरसकोल्हे,निशा कोल्हे सह जिल्ह्यातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.





