Home गडचिरोली महाराष्ट्रतील 39 खरात भक्त आमदारांना निलंबित करा. माकपाची...

महाराष्ट्रतील 39 खरात भक्त आमदारांना निलंबित करा. माकपाची मागणी

35

महाराष्ट्रतील 39 खरात भक्त आमदारांना निलंबित करा.

 

माकपाची मागणी

 

महाराष्ट्रत सध्या गाजत असलेल्या प्रकाश खरात प्रकरणात रोज रोज नविन तथ्ये समोर येत आहेत.

देव, धर्म, आध्यात्मिक च्या आधारे अनेल महिलांना व लोकांना फसवणार्या अशोक खरात व त्याला साथ देणार्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी या साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज राज्य भर आंदोलन करण्यात आले.

गडचिरोली जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी येथे मा. मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार आरमोरी मार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनात भोंदू बाबा अशोक खरात व त्याच्या सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करा. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्ध निर्मूलनाच्या कामासाठी उपयोगात आणा, अंधश्रद्धा व संतापजनक शोषणाच्या या प्रकरणामध्ये ३९ आमदार सामील असल्याचे समोर येत आहे. या ३९ आमदारांची नावे जाहीर करा. त्यांच्या सहभागाचे स्वरूप जनतेला समजावे अशाप्रकारे ते सार्वत्रिक करा. अशा आमदारांचे तत्काळ राजीनामे घ्या , अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे वाईट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे. असे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटवा, अशोक खरात याच्याबरोबरच इतरही अनेक गावागावांमध्ये सध्या भोंदू बाबांचे उदंड पीक आले आहे. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाचा पाठपुरावा करण्याऐवजी जाती आणि धर्म आधारित द्वेषवादी अंधश्रद्ध राजकारणाला बळ दिल्याचा हा परिणाम आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यातील या सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणा, जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून या कायद्याची कठोर अंमलबजावणी करा , सोशल मीडियातून होणाऱ्या बाबा-बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

निवेदन देतांनी कॉ. अमोल मारकवार माकपा जिल्हा सचिव, प्रशांत खोब्रागडे, संजय वाकडे, दशरथ मेश्राम, प्रमोद कोसेकर, रमेश मेश्राम, अर्चना मारकवार, शिला खांडेकर, सपना खोब्रागडे, हे उपस्थित होते.

Don`t copy text!