Home Breaking News *गट्टा शाळेत ९वी-१०वी वर्ग सुरू करण्याची मागणी; भाकपा व ग्रामस्थांचे निवेदन*

*गट्टा शाळेत ९वी-१०वी वर्ग सुरू करण्याची मागणी; भाकपा व ग्रामस्थांचे निवेदन*

38

*गट्टा शाळेत ९वी-१०वी वर्ग सुरू करण्याची मागणी; भाकपा व ग्रामस्थांचे निवेदन*

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत ९वी व १०वीपर्यंत वर्ग वाढवून देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.

गट्टा हे परिसरातील मुख्य गाव असून आजूबाजूच्या अनेक लहान-मोठ्या गावांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र, सध्या शाळा केवळ ८वीपर्यंतच उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी गट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत तात्काळ ९वी व १०वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी भाकपा व ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनुजी गोटा, तालुका सहसचिव भाकपा विशाल पूज्जलवार, मुख्याध्यापक मंतय्या बेडके, गाव पाटील कन्ना होता, ग्रामविकास अधिकारी मनोज मेश्राम, तानेंद्र लेकामी, मिथुन मल्लिक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते व त्यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शविला. तसेच यावेळी सुहास गाळे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

Don`t copy text!