रईतवारी जांब येथे सोनटक्के परिवाराचा विवाह सोहळा उत्साहात
मान्यवरांच्या उपस्थितीत नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव
सावली : वृत्तवाणी न्यूज
तालुक्यातील रईतवारी जांब येथे सोनटक्के परिवारातील विवाह सोहळा रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामविकास अधिकारी रमेश बोरकुटे यांची भाची चि.सौ.का. नेहा बबनराव पाटील सोनटक्के यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन रईतवारी जांब येथे करण्यात आले होते. विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यास प्रविण चन्नावार, निखिल कुमरे (गटशिक्षणाधिकारी, भामरागड), डोरलीकर (लेखाधिकारी), हेमंत खोब्रागडे, तसेच कळंबे (ग्रामविकास अधिकारी) यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
पारंपरिक विधी, आनंदी वातावरण आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आनंदात पार पडला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आदरातिथ्याबद्दल सोनटक्के परिवाराचे उपस्थितांनी कौतुक केले.





