Home Breaking News गडचिरोलीत काँग्रेसचा भव्य शक्तीप्रदर्शन सोहळा; विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहणाने कार्यकर्त्यांत जल्लोष

गडचिरोलीत काँग्रेसचा भव्य शक्तीप्रदर्शन सोहळा; विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहणाने कार्यकर्त्यांत जल्लोष

194

गडचिरोलीत काँग्रेसचा भव्य शक्तीप्रदर्शन सोहळा; विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहणाने कार्यकर्त्यांत जल्लोष

शेतकरी मेळाव्यात शेतकरी प्रश्नांवर मंथन; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला राजकीय वजन
रामदास मसराम यांच्याकडून शुभेच्छा; वडेट्टीवारांसह काँग्रेस नेत्यांची एकजूट दिसली

गडचिरोली : जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला भव्य शेतकरी मेळावा तसेच काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या नेतृत्वाचे जोरदार स्वागत केले. संपूर्ण परिसर घोषणांनी व टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाला आमदार रामदासजी मसराम यांनी विशेष उपस्थिती दर्शवत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्यात सहभागी होत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीतील वाढता खर्च, बाजारभाव, सिंचन व शासकीय योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
मेळाव्यात शेतकरी हिताचे विविध मुद्दे, शेतीसमोरील आव्हाने, ग्रामीण भागातील विकासकामे तसेच काँग्रेस संघटन अधिक बळकट करण्यावर सविस्तर मंथन झाले. उपस्थित मान्यवरांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला माजी विरोधी पक्ष नेते तथा गटनेते Vijay Wadettiwar, प्रदेश सचिव Kunal Choudhary, भारतीय राष्ट्रीय सचिव Ajay Chikara, आमदार Abhijeet Wanjari, आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Vasantrao Purke, माजी खासदार Marotrao Kowase, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार, पंकज गुडेवार, रामभाऊ मेश्राम, बंडू शनिवारे, रवींद्र दरेकर, प्रकाशभाऊ इटनकर, हनुमंत मडावी, वामनराव सावसागडे, समशेर खा पठाण, नगरसेवक राजूभाऊ राशेकर, नगरसेवक विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहणामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Don`t copy text!