गडचिरोली:- शेतकऱ्यांची उन्हाळी फसल निघालेली आहे शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत होते परंतु धान खरेदी सुरु झाली नवती धान खरेदी केंद्र लवकर सुरू करण्यात यावे या साठी काही शतकऱ्यांचे शिष्टमंडळ शिवसेना माजी महिला संघटिका तथा माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे यांची भेट घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्या विषयी निवेदन दिले होते त्याच क्षणी छाया ताई कुंभारे विधानसभा संघटक नंदू भाऊ कुमरे यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर धडक देण्यात आली व निवेदन व्यवस्थापाक श्री कोटलावर याना देऊन चर्चा करण्यात आली होती तसेच जिल्ह्यात सर्वच ठिकाणचे धान खरेदि केंद्र ही त्वरीत सुरू करावे अशी मागणी धरून सुमारे एक तास चर्चा करण्यात आली होती येत्या एक दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू करू असे आश्वासन दिले अन्यता आंदोलन करू असा इशारा शिवसेना माजी महिला संघटिका छायाताई कुंभारे विधानसभा सभा संघटक नंदू भाऊ कुमरे अश्विनी भाडेकर यांनी दिला होता आंदोलनाची दखल घेऊन अनेक ठिकाणचे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले या मुळे शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले तरी आंदोलक छायाताई कुंभारे माजी महिला संघटिका विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे अश्विनी भांडेकर यांनी आदिवासी महामंडळ चे आभार मानले