Home Breaking News *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभा संपन्न..*

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभा संपन्न..*

14

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभा संपन्न..*

आज सोमवार, दि. 4 मे 2026 ला दुपारी 4.30 वाजता *जिल्हा शिक्षक नेते धनपालभाऊ मिसार* यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली येथे जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभा संपन्न झाली. यात खालील निर्णयाचा समावेश आहे..

• नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासंबंधी शासन परिपत्रकाच्या(15 जूनला शाळा सुरु करणे) विरोधात मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला..

• महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिक्षक समितीनिष्ठ कार्यकर्त्यांचा, त्यांच्या शिक्षक समितीतील योगदानाबद्दल भावपूर्ण सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

* शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली कडून सकाळी शाळा उघडल्यावर व संध्याकाळी शाळा बंद करता वेळी जिओ टॅगिंगचे फोटो शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीला पाठविणे या संदर्भात तीव्र विरोधात्मक भावना व्यक्त करण्यात आली..

* ‘मावा नार मावा शाळा’ उपक्रम उमेदकडूनच यशस्वी करण्यात यावा, शिक्षकांना यात नाहक गुतवू नये यावर सर्वांचे एकमत झाले..

• नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आगामी शैक्षणिक वर्षापासून दुसरी, तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे त्या अनुषंगाने तालुकास्तरावरील शिक्षक प्रशिक्षणात जनगणना करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना वगळण्यात यावे अन्यथा त्यांच्यासाठी जनगणने नंतर स्वतंत्र प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी करून तसे निवेदन मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्याचे ठरविण्यात आले..

• नक्षलग्रस्त व दुर्गम भागात कार्य करणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीची वेतनश्रेणी मिळावी यासाठी मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली..

• शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा, प्रलंबित असलेला निवडश्रेणीच्या प्रश्नासह शिक्षकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली..

सदर कार्यकारिणी सभेला शिक्षक नेते मा.रमेशभाऊ रामटेके, राज्य प्रतिनिधी जयंत राऊत, रवीभाऊ मुलकलवार,अमोल जोशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर गडपायले, प्रशांत काळे सरचिटणीस तालुका धानोरा, राजेंद्र भुरसे तालुकाध्यक्ष, सरचिटणीस सचिन मेश्राम, उपाध्यक्ष अविनाश वऱ्हाडे तालुका गडचिरोली, मनोज रोकडे तालुकाध्यक्ष वडसा, बंडू सिडाम तालुकाध्यक्ष कुरखेडा, देवेंद्र लांजेवार सोबतच जिल्ह्यातील शिक्षक समितीचे विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष योगेशभाऊ ढोरे, संचालन कार्याध्यक्ष डंबाजी पेंदाम तर आभार प्रदर्शन खिरेंद्र बांबोळे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गडचिरोली यांनी केले..

Don`t copy text!