प्रशासना कडून ग्रामपंचायत मतदानासाठीची तयारी पूर्ण

130

प्रशासनाकडून मतदारांना मतदान हक्क बजावण्यासाठी आवाहन

गडचिरोली दि.14, जिमाका  : जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींमध्ये तयारी पुर्ण झाली आहे. उद्या दि.15 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील सहा तालुक्यातील 499 मतदान केंद्रावर व 10 सहाय्यकारी मतदान केंद्रावर असे मिळून 509 मतदान केंद्रावर आहे. या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सहा तालुक्यातील 170 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 31 हजार 489 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला 1 जाख 14 हजार 235 तर पुरूष 1 लाख 17 हजार 254 आहेत. उद्या होणाऱ्या निवडणूकिसाठी 499 प्रभागामधून 1124 जागांसाठी 2578 उमेदवार आपले मत आजमावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2622 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 499 मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य घेवून पोहोचले आहेत.