*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.खासदार अशोक नेते*
———————————————-
*छत्रपती शिवाजी संकुल देवरी जिल्हा गोंदिया यांचे वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव सोहळा साजरा*…
———––———————————-
दि.१९ फेब्रुवारी २०२३
ता.देवरी:-देवरी येथील स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था द्वारा संचालित छत्रपती शिवाजी संकुलच्या वतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव निमित्याने
विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम,भाषणे, रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, दंतशिबिर,स्वच्छता अभियान,मोफत औषधी उपचार,पॉलिटेक्निक महाविद्यालय रायगड ता.देवरी या सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
छत्रपती शिवाजी संकुल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला खासदार अशोक नेते,खासदार सुनिल मेंढे,माजी आमदार संजय पुराम, संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर सर, शिक्षण महर्षी झामसिंग येरणे,सचिव तथा तालुकाध्यक्ष अनिल येरणे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पॉलिटेक्निक कॉलेज रायगड देवरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून ध्वजारोहण खासदार अशोक नेते, खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार अशोक नेते यांनी शिवजयंती उत्सवानिमित्ताने अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे,रयतेचे जाणते राजे होते.शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शासन, सुशासन व प्रशासन,जनहितार्थ व अतिशय पारदर्शकतेचे होते. शिवरायांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य मौलाचे व उल्लेखनीय होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.तेव्हा स्वराज्यात त्यांनी दीनदुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी केव्हाही जातीयवाद केला नाही.छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व, कामगिरी, समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून व्यक्त केले.
या वेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, खासदार भंडारा/गोंदिया लोकसभा क्षेत्राचे सुनिलजी मेंढे ,आमगांव/देवरी विधानसभाचे माजी आमदार संजय पुराम,गोंदिया/भंडारा जिल्हाचे संपर्क प्रमुख विरेंद्र (बाळाभाऊ)अंजनकर सर,शिवचरित्र वक्ते नितीन कारेमोरे,शिवव्याख्याते दत्ताभाऊ घुगे,नगराध्यक्ष न.पं. देवरी संंजुभाऊ उईके,उपाध्यक्षा न.पं.प्रज्ञाताई संगीडवार,सभापती प.स.देवरीच्या अंबिकाताई बंजार,शिक्षणमहर्षी रामसिंगजी येरणे,संस्थेचे सचिव तथा भाजपा तालुकाध्यक्ष अनिल येरणे, कृष्णाताई येरणे,प्राचार्य डाॅ.अनिल चांदेवार, प्राचार्य डॉ. भुषणकुमार साठे, डॉ.सुनिल येरणे, से.नि.प्राचार्य डॉ.घुसकुळे आदी उपस्थित होते. तसेच पॉलिटेक्निक कॉलेज रायगड छत्रपती शिवाजी संकुल देवरी या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी रामसिंगजी येरणे यांनी प्रास्ताविक केले.एस.टि.मेश्राम सर यांनी सूत्रसंचालन केले, तर अनिल येरणे यांनी आभार मानले.






