Home गडचिरोली शिवसेना महिला आघाडी च्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध

शिवसेना महिला आघाडी च्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध

138

शिवसेना महिला आघाडी च्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध……..………….

गडचिरोली =आज दिनांक 21 / 2 / 2023 ला मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हा संगठिका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला. दोन गुजराती एक मराठी माणसाचा स्थानिक पक्ष फोडतात, संपवतात, ते देखील दुसऱ्या एका मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन….. आणि मराठी असलेली पण बुद्धी गहाण ठेवलेली भक्त मंडळी या सर्व प्रकारचा आनंद घेतात या महाराष्ट्रात दृदेवी गोष्ट ती काय? केन्द्र सरकारच्या दबावात येऊन दबावतंत्र बळी पडलेल्या धूतराष्ट्राची भूमिका वटविनाऱ्या लाचार केंद्रीय निवडणूक आयोगाने मिंदे गटाला मूळपक्षाचे नाव व चिन्ह बहाल करणाऱ्या निवडणूक आयोगाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेना जिल्हा महिलाआघाडी संगठिका यांनी निषेध केला . या प्रसंगी शिवसेना महिला संगठिका छायाताई कुंभारे, माजी जि. प. संदस्य उपजिल्हा संगठिका सुनंदा आतला, तालुका समनव्यक नूतन कुंभारे, शहर समनव्यक स्वाती दासेवर, उपशहर संगठिका सिमा परासर, शाखा प्रमुख ज्योशना राजूरकर, शाखा प्रमुख देवकी कंकडावार, शाखा प्रमुख गीता सोनूले, शाखा प्रमुख संदया हेमके, कारवाफा सरपंच महानंदा आतला, प्रभारी तालुका प्रमुख आरती खोब्रागडे आदी महिला उपश्चित्त होते.

Don`t copy text!