*वायुनंदना पावर प्लांट मधील काढलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना पुन्हा सामावून घ्या*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना खाजगी सुरक्षारक्षकांचे निवेदन*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आंदोलन स्थळी जाऊन घेतली उपोषण करणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांची व वायूनंदना प्रशासनाची भेट*
*महाराष्ट्र खाजगी सुरक्षा अधिनियम १९८१च्या ( नियमन व कल्याण ) च्या तरतुदी लागू करण्याची केली मागणी*
*दिनांक २१/२/२०२३ गडचिरोली*
*महाराष्ट्र राज्य खाजगी सुरक्षा अधिनियम १९८१ (नियमन व कल्याण )च्या तरतुदी लागू कराव्यात अशी मागणी करणाऱ्या वायु नंदना पावर प्लांट गडचिरोली येथील खाजगी सुरक्षा रक्षकांना कंपनीने तातडीने कामावरून कमी केल्याने सुरक्षा रक्षकांनी कामावर परत घेण्यासाठी आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनाला आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी आज भेट दिली व या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर सामावून घेण्यात यावे अशी मागणी वायू नंदना प्रशासनाकडे केली.*
*यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना सुरक्षार क्षकांच्या वतीने निवेदन देण्यात आले व महाराष्ट्र राज्य खाजगी सुरक्षा अधिनियम १९८१ च्या तरतुदी लागू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली. त्यांच्या मागण्यावर चर्चा करून आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी वायूनंदना प्रशासनाची भेट घेत वायूवंदनाचे व्यंकटराव यांच्याशी या संदर्भात विस्तृत चर्चा केली व ज्या कंपनीच्या माध्यमातून यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातूनच त्यांना प्रमाणपत्र देऊन दुसरीकडे सामावून घेण्यात यावे या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले.*






