Home गडचिरोली *सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे “२ दिवस विश्रांतीचे,स्त्रीच्या सन्मानाचे”अभियांन विविध शाळा-महाविद्यालय,सरकारी कार्यालयात...

*सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे “२ दिवस विश्रांतीचे,स्त्रीच्या सन्मानाचे”अभियांन विविध शाळा-महाविद्यालय,सरकारी कार्यालयात संपन्न

89

*सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे “२ दिवस विश्रांतीचे,स्त्रीच्या सन्मानाचे”अभियांन विविध शाळा-महाविद्यालय,सरकारी कार्यालयात संपन्न*

 

*सावली[ ता.प्र.]*

*दिनांक:२१-०२-२०२३*

 

*चला लढूया ….. चला जिंकूया* या घोषणे अंतर्गत राज्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच शासकीय महिला कर्मचारी यांना मासिक पाळी दरम्यान दोन दिवस हक्काची आणी पगारी सुटी मिळावी यासाठी १६ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत सुरु असलेल्या या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आद.शिवानी ताई विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

मासिक पाळी हा नैसर्गिक विषय असून सुरवातीच्या दोन दिवस होणाऱ्या असह्य वेदनापासून दिलासा मिळावा यासाठी दार महिन्याला किमान सुरवातीच्या दोन दिवसाचि सुटी मिळणे आवश्यक आहे.

मासिक पाळी मुळे अनेक महिलांनी गर्भाषय काढल्याच्या अनेक घटना या पूर्वी राज्यात घडल्या आहेत.हा काही योग्य पर्याय नसून भविष्यात अश्या महिलांना मोठ्या गंभीर आजारांना सामोर जावे लागल्याचे देखील अनेक उदाहरणे आहेत.या पूर्वी केरळ सरकारने विध्यार्थिनी साठी तर बिहार सरकारने शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यासाठी पुढाकार घेतला.

आपल्या राज्यात देखील आपण सर्वांनी पूढाकार घेतला तर नक्किच यावर कार्यवाही होऊन निर्णय घेतला जाऊ शकतो, मात्र तो तुमचा सहभागाशिवाय शक्य नाही म्हणूनच सर्व विद्यार्थीनी तसेच माता- भगिनींना नम्र आवाहन आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आद.शिवानी ताई विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

त्या अनुषंगाने सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे “२ दिवस विश्रांतीचे,स्त्रीच्या सन्मानाचे” अभियांन विविध शाळा-महाविद्यालय,सरकारी कार्यालयात सावली तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष कमलेश विलास गेडाम यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला.

तरी तालुक्यातील सर्व विद्यार्थिनी आणी महिलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमीटीचे तालुकाध्यक्ष नितीन गोहने व तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर यांनी केले आहे.

या वेळी,अंतबोध बोरकर, नगरसेवक न.प.सावली, बादल गेडाम,यश गेडाम,अर्जित डोंगरे, संकेत दुधे, प्रतिक दुधे, कुणाल गेडाम, अत्तदीप घडसे, अंकुश गेडाम,मयूर दुधे,अमन गोवर्धन, आकाश मालवणकर व तसेच विविध शाळा-महाविद्यालय,सरकारी कार्यालयातील विद्यार्थिनीं, महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

 

 

 

अधिक माहितीसाठी संपर्क:

कमलेश विलास गेडाम

अध्यक्ष, सावली तालुका काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

कार्याध्यक्ष-मा.आमदार.श्री.विजय वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय सावली

मो.नं. 8390761654

Don`t copy text!