Home गडचिरोली प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तसेच अमरावती जिल्हा प्रमुख मा.प्रवीण भाऊ...

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तसेच अमरावती जिल्हा प्रमुख मा.प्रवीण भाऊ हेंडवे आरमोरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पीडब्ल्यूडी विश्रामगृह आरमोरी इथे आगमन

97

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते

तसेच अमरावती जिल्हा प्रमुख

मा.प्रवीण भाऊ हेंडवे आरमोरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पीडब्ल्यूडी विश्रामगृह आरमोरी इथे आगमन

जिल्ह्यातील समस्यांवर कार्यकर्तासोबत चर्चा

मा. बच्चूभाऊ कडू यांनी अधिवेशन दरम्यान पालघर मध्ये राहणाऱ्या मदारी व इतर भटक्या जमाती लोकांसाठी राहण्याची व्यवस्था व त्यांना घराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः पालघर मध्ये राहणाऱ्या लोकांसोबत राहून दोन दिवशीय आंदोलन केले होते. त्याची फलसृती होऊन स्वतः मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी या अनोख्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दर्शवून बेघर व भटक्या लोकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील भटक्या जमातीची माहिती घेण्यासाठी मा. बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार अमरावती प्रहार जिल्ह्याप्रमुख मा. प्रवीणभाऊ हेंडवे यांनी गडचिरोली -चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते यांची भेट घेतली. त्यावेळी अशा अनेक विषयावर चर्चा झाली. व भाऊच्या माध्यमातून घरकुल प्रश्न मार्गी लावण्याचे मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी या बैठकीसाठी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे गडचिरोली जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित मा, निखिल धार्मिक मा ,मंगेश पोरठे मा, रिंकू झरकर मा, विवेक ठाकरे मा शेरखान पठाण अनंता भोयर, महेश मेश्राम छाया ताई मानकर विनोद निमजे विकास धंदरे व आणि बरेच कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते

Don`t copy text!