*भाजपा चामोर्शी तालुका मंडळाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न*
*गडचिरोली | दि. 7 मे 2026*
*भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार दर महिन्याला मंडळाची बैठक घेणे अनिवार्य असल्याने भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका मंडळाची आढावा बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. 2 जनसंपर्क कार्यालय, चामोर्शी येथे इंजि. प्रमोदजी पिपरे चामोर्शी तालुका मंडळ प्रभारी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. बैठकीस जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.*
*बैठकीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम, पदवीधर मतदार नोंदणी, एस.आय.आर. तसेच विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.*
*यावेळी तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, तालुका महामंत्री शेषराव कोहळे, साईनाथ बुरांडे किसान आघाडी जिल्हा महामंत्री,संजय खेडेकर, विष्णू ढाली, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजनवार ज्येष्ठ नेते, श्रावण पाटील सोनटक्के, माणिक कोहळे, सोपान नैताम, रमेश नैताम, लोमेश बुरांडे, कविताताई किरमे, ममताताई श्रीमंतवार, अर्चना कात्रजवार, कौशल्या बुरांडे, किशोर गटकोजवार, हर्षद भांडेकर, ज्ञानेश्वर भांडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.*







