*अहेरीत शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह इमारतीचे भूमिपूजन*
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते
*विद्यार्थ्यांची योग्य सोई होणार*
*अहेरी-* शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह इमारत बांधकामाचे उदघाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मंगळवार 21 फेबुवारी रोजी भूमिपूजन करण्यात आले असून भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रेमराव लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश मड़ावी, मांतय्या आत्राम, अरुण मुक्कावार, सुरेंद्र अलोणे, गृहपाल स्वयंता बोरकर, गृहपाल चेतन खेड़ीकर, संतोष तोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी विधिवत पणे पूजन करून व कुदाळी मारून भूमिपूजन केले. विद्यार्थ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या वस्तीगृहामुळे व प्रशस्त इमारतीमुळे योग्य सोई सुविधा उपलब्ध होणार आहे.






