धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डिलर्सच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडचिरोली: देशात आणि राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शहरातील विविध ठिकानी उत्साहात साजरी करण्यात आली.
गडचिरोली शहरातील धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डिलर्स रिलायन्स पेट्रोल पंप समोर,चंद्रपूर रोड, गडचिरोली येथील कार्यालयात परमपूज्य, महामानव, भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रजवलन ,व माल्यार्पण धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर्सचे संचालक जितू धात्रक यांचे हस्ते करण्यात आले. नंतर फळ व शरबतचे वाटप मार्गावरून जाणाऱ्या, येणाऱ्या लोकांना करण्यात आले.यावेळी जितू धात्रक सह अंकित बुचे,जगदीश धात्रक,प्रणय धात्रक, शिवाजी उपलवार, धनेश गेडाम, धनराज मोहूर्ले, सूरज मलोडे, नागेश मडावी, विकी बांबोले,पवन ताडाम,पूनाजी पिपरे, प्रफुल ठाकरे,रोहित कनाके,देवानंद देवगडे, संतोष खडसे,अनिता कांबळे, दीक्षा बांबोळे उपस्थित होते.






