सोमनपल्ली ग्रा.पं. मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण
– कमलताई मोहुर्ले यांना प्रथम पुरस्कार
प्रतिनिधी / चामोर्शी : महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्तम काम करणार्या महिलांना प्रोत्साहन देण्याकरीता यावर्षीपासून ग्रा.पं. स्तरावर पुरस्कार देण्याचे शासनाने जाहिर केले. त्यानुसार तालुक्यातील सोमनपल्ली ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रा.पं. स्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार कमलताई रविंद्र मोहुर्ले यांना तर द्वितीय पुरस्कार सुनिताताई सुरेश मेकर्तीवार यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निलकंठ पा. निखाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच निलेश मडावी, ग्रामसेवक राकेश अलोणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव मडावी, ग्रा.पं. सदस्या शितल अवथरे, मंगला सिडाम, ज्योत्सना मेडपल्लीवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरपंच निखाडे म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांनी महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा आदर्श घेत इतर महिलांनीसुध्दा समाजात समाजोपयोगी कार्य करून नावलौकीक करावा याकरीता हा पुरस्कार देण्यात येत आहे. यापुढे इतर महिलांनीसुध्दा अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कार्य करावे.
कार्यक्रमाला विकास महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा रेखाताई गाजुलवार, सचिव शालुताई सरवर, सदस्य ललिता मडावी, शेवंता कस्तुरे, काजल सरवर, ललिता कुपलवार, शिलाताई गदेकार, वंदना ठाकरे, निर्मला ठाकरे, किरण अलोणे, माधुरी मेश्राम, किरण लोणारे, जिजाबाई पेशट्टीवार, तारामनी नेवारे, ग्रामसंघाचे कमलबाई मोहुर्ले, आयसीआरपी सुनिताताई मेकर्तीवार, विशाखा कस्तुरे, माधुरी गोडबोले, ग्रामपंचायतचे कर्मचारी राकेश देठेकर, रंजीत माहोरकर, योगेश देठेकर आदी उपस्थित होते.





