*सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांचा सुधारित जिल्हा दौरा*

78

*सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांचा सुधारित जिल्हा दौरा*

गडचिरोली दि.२६ : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल हे दिनांक २७ आणि २८ डिसेंबर, २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, २७ डिसेंबर २०२५: दुपारी ०३.३० वा. गडचिरोली येथे आगमन व मुख्यमंत्री महोदयांसमवेत विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे मुक्काम.

रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०६.३० वा. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्रांगणात पोलीस दलातर्फे आयोजित ‘गडचिरोली महामॅरेथॉन’ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०.०० वा. मौजा चुरचुरा (ता.जि. गडचिरोली) येथे आगमन व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी ११.१५ वा. मौजा इंजेवाडी (ता. आरमोरी) येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे सांत्वनपर भेट. दुपारी १२.१५ वा. मौजा देऊळगाव (ता. आरमोरी) येथे भेट देऊन वन्य प्राण्याच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट. दुपारी ०१.०० वा.: देऊळगाव येथून नागपूरकडे प्रयाण.