*राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्या*  *आमदार डॉक्टर देवरावजी होळी

75

*राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्या*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

 

*कोटगल येथे शासन आपल्या दारी महाराजस्व अभियानाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन*

 

*विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश, शेतकरी लाभार्थ्यांना अनुदानीत ट्रॅक्टर सह लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप*

 

*दिनांक २ जून २०२३ गडचिरोली*

 

*केंद्र व राज्य सरकारने जनकल्याणाच्या असंख्य योजना सुरू केल्या असून त्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले.*

 

*गडचिरोली तहसील कार्यालय व सर्व शासकिय विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी ,महाराजस्व अभियानाचे आयोजन कोटगल येथे करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या हस्ते करण्यात आले*

 

*यावेळी तहसीलदार महेंद्रजी गणवीर कोडगलच्या सरपंच ममताताई दुधबावरे, पार्डीचे सरपंच संजय भाऊ निखारे, नायब तहसीलदार ठाकरे साहेब विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्यानं उपस्थित होते.*