चामोर्शीच्या निलंबित ठाणेदाराची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी

147

चामोर्शीच्या निलंबित ठाणेदाराची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी

 

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, न्यायाधीश शिवीगाळ व धमकी प्रकरण

 

गडचिरोली : चामोर्शी पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती.. त्यांना शनिवारी (३ जून) चामोर्शी येथील न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे निलंबित पोलीस निरीक्षक खांडवे यांची चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

 

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मारहाण केल्याचे प्रकरणात चामोर्शीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २० मे रोजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुढील सुनावणी ९ जून रोजी चामोर्शी न्यायालयात होणार होती.

 

दरम्यान, विरोधात निकाल दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या निलंबित पोलीस निरीक्षकांनी २५ मे रोजी पहाटे

 

५ वाजताच्या सुमारास चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायाधीशांच्या निवासस्थानी जावून त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यामुळे न्यायाधीशांनी या प्रकरणाची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (२ जून ) निलंबित पोलीस निरीक्षकाला अटक केली. शनिवारी चामोर्शी न्यायालयात खांडवे यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे निलंबित पोलीस निरीक्षक खांडवे यांची चंद्रपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.