*युवकांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन संस्कृती जपावी.खासदार अशोक नेते.
* ——————––——————
*नेहरू युवा केंद्र, गडचिरोली युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार* द्वारा आयोजित *युवा उत्सव २०२३*.. कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे बक्षीस वितरण समारोप कार्यक्रम संपन्न… —————————————-
दि.०७ जुन २०२३ गडचिरोली:-नेहरू युवा केंद्र, गडचिरोली युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित युवा उत्सव -२०२३ , कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले. या समारोपीय बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना, युवकांनी अशा कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव मिळवत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. या सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन करावे, अशा कार्यक्रमातून युवकांनी व्यक्तिमत्व विकास करावा.सर्व सहभागी झालेल्या स्पर्धकांची यावेळी स्तुती केली. विजय, पराजय, होणे सहाजिकच आहे,जे स्पर्धक विजय झाले त्यांचा अभिनंदन व जे ,स्पर्धक पराजय झाले त्यांनी खचून न जाता प्रयत्न करावे..युवकांनी मनन, चिंतन करुन कृतीमध्ये कार्यक्रम आणावं तेव्हाच या कार्यक्रमाचे फलित होईल. अतिशय चांगला स्तुतिमय कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित केला.युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन या समारोपीय बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून केले. पुढे खासदार महोदयांनी बोलतांना कार्यक्रमात युवकांचा सहभाग आणि युवा कलागुणांना चालना देण्याबरोबरच युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी युवकांनी इथल्या कलागुणांना, संस्कृती इथल्या चालीरिती, रूढी, परंपरा आणि ठेक्यावर ताल धरून नाचायला लावणारे रेला’ गित इथली तरुणाई प्रतिभा संपन्न असून खेळ, नृत्य, संगित अशा विधी कला – गुणांनी भरलेल आहे.याच तरुणाईला आपल्या कला गुणांनी G -२० प्रदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामूहिक नृत्य, भाषण, चित्रकला कविता, फोटोग्राफी अशा विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम/ विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण सोहळा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते पार पडला. सामुहिक नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५०००/- द्वितीय पारितोषिक २५००/- तृतीय पारितोषिक १२५०/-अशाप्रकारे अनेक स्पर्धेचे पारितोषिक ठेवण्यात आलेले होते.या सर्व सहभागींना प्रमाणपत्र व विजेत्यांना ट्रॉफी, चित्रकला, कविता, छायाचित्र (फोटोग्राफी) स्पर्धेतील २ विजेते आणि भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रथम विजेते यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यावेळी मंचावर प्रामुख्याने समारोपीय बक्षिस वितरण सोहळ्याने अध्यक्ष मा.खासदार श्री. अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा,प्रमुख अतिथी श्री. चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा,आमित जी फुंडे जिल्हा युवा अधिकारी गडचिरोली, डॉ.शांती पाटील सहयोगी प्राध्यापिका कृषी महाविद्यालय गडचिरोली,विवेक कहाळे जिल्हा संघटक,भारत स्काऊट गाईड, मनोहर हेपट, भास्कर मेश्राम, मनीषा मडावी, युवा मोर्चाचेे उल्हास देशमुख, तसेच मोठ्या संख्येने युवा विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.






