*शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात*
*नगरपरिषद गडचिरोलीच्या विकास निधीतून स्नेहनगर व इंदिरानगर परिसरातील कामांना सुरुवात; नागरिकांना दिलासा.*
*गडचिरोली, दि. १८ एप्रिल*
*नगरपरिषद गडचिरोलीच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत स्नेहनगर व इंदिरानगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाच्या कामांचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.नगराध्यक्ष सौ. प्रणोतीताई निंबोळकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष,(माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका नप गडचिरोली सौ.योगिताताई पिपरे आणि भाजप शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती श्री. अनिल जी कुनघाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.*
*विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत स्नेहनगर येथे धनोरा मेन रोड ते तुलाराम नैताम ते किशोर सोमनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच नगरोत्थान योजने अंतर्गत इंदिरानगर येथे धोडरे ते मडावी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व भुरले ते डोकरमारे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करण्यात येत आहे.*
*याप्रसंगी या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होऊन पावसाळ्यातील अडचणी कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. योगिताताई पिपरे यांनी केले.*
*भूमिपूजन कार्यक्रमास श्री. अनुरागजी पिपरे संचालक पिपरे पेट्रोलियम सर्विसेस गडचिरोली,कंत्राटदार श्री.पंकज भांडेकर,अभियंता,श्री.रंगारी,श्रीभुरसे,श्री.डोकरमारे,सौ.योगिताताई उईके,सौ.शुभांगीताई डोकरमारे, सौ.शालिनीताई भुरसे तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*






